राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या महापुरुषाच्या बाबत वादग्रस्त विधान असो की चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा वाद सुरू आहे.
छत्रपती संभाजी राजेंवरील चित्रपटावरून टीका सुरू असतानाच मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. अभिनेते किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत राहुल सोलापूरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
https://www.facebook.com/watch/?v=631615542620685
या व्हिडीओ मध्ये मराठी चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर काय म्हणाले हे स्पष्ट होत नसले तरी, त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध सुरू असून अनेक शिवप्रेमींनी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
या प्रकरणावर राहुल सोलापूरकर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ‘छावा’ चित्रपटा वरून सुरू असलेला वाद आणि आता राहुल सोलापूरकर याच्या विधानामुळे निर्माण झालेला नवा वाद, यामुळे मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

