मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट 2025 संसदेत सादर केला. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्याचे प्रतिक्रिया समोर आल्या आहे. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या बजेट बाबत महाराष्ट्र संदेश न्युजला प्रतिक्रिया दिली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाची घोषणा नसून शेतमालाला दुप्पट भावासंबधी बजेट मध्ये कोणतीही योजना नाही. दर वर्षी दोन करोड रोजगार देण्याची भूलथाप यंदाही कायम आहे. शिक्षणासाठी, रोजगारासाठी कोणतीही योजना नसलेले निरर्थक बजेट असून केवळ फक्त जातीवाद धर्मवाद यातच मोदी सरकारला रस आहे. केंद्र सरकारकडून हमीभावाची घोषणा न करून शेतकऱ्यांचा पदरी निराशाच पडली आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली.

