महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारताची ओळख जगतिक दर्जावर बुद्धाचा देश म्हणून होते. त्यामुळे जगातील सर्वच देश भारताला बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात. त्यामुळे आज देशाच्या अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात बौद्ध तीर्थस्थळाबाबत आजच्या 2025 च्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केल्या.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्यात चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, लाओस, सिंगापूर सह अनेक देश आहेत. जिथे बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांमधून दरवर्षी लाखो लोक भारतात येतात आणि बौद्ध स्थळांना भेट देतात. म्हणूनच, पर्यटन लक्षात घेऊन, 2025 च्या अर्थसंकल्पात भारतातील बौद्ध स्थळांचा विकास करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
अर्थसंकल्पात काय घोषणा: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात सादर करताना म्हणाल्या की, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार बुद्ध सर्किट विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्यांनी बोधगया विकसित करण्याबद्दलही बोलले. बुद्ध सर्किटमध्ये अनेक बौद्ध स्थळांचा समावेश आहे जे आता सरकार विकसित करणार आहे. आता आपण बुद्ध सर्किटमध्ये समाविष्ट असलेल्या प्रमुख ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
बोधगया हे बुद्ध धम्माचे सर्वात प्रमुख स्थळ आहे. बिहार राज्यात बोधगया हे ते ठिकाण येते जिथे गौतम बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. सारनाथ ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी येथेच पहिला उपदेश दिला होता. त्याला पाहिले धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखतात. कुशीनगर हे उत्तर प्रदेशातील एक प्रमुख बुद्ध धम्माचे केंद्र आहे, जिथे भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले होते. राजगीर बिहार राज्यात असून या ठिकाणी गौतम बुद्धांनी अनेक वर्ष राहून जनतेला प्रवचन दिले. वैशाली एक प्रमुख तीर्थक्षेत्र असण्यासोबतच, ते भगवान महावीरांचे जन्मस्थान देखील आहे. श्रावस्ती नेपाळ सीमेजवळ असलेल्या या शहरात गौतम बुद्ध अनेक वर्षे राहिले. सांची मध्य प्रदेश येथील सांची येथे बौद्ध धर्माची अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे, पुतळे आणि स्तूप आहेत. येथील सम्राट अशोक यांनी बांधलेले सांची चे स्तूप जगविख्यात आहे. अमरावती महाराष्ट्रात असलेले अमरावती हे बौद्ध धर्माच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. सम्राट अशोकाने येथे एक बौद्ध मठ आणि स्तूप बांधला. नागार्जुनकोंडा तेलंगणा राज्यात स्थित, या ठिकाणाचे नाव दक्षिण भारतीय बौद्ध गुरू नागार्जुन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.ही भारतातील बौद्ध धर्माची प्रमुख ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी भारत आणि परदेशातून अनेक पर्यटक भेट देतात. बुद्ध सर्किटच्या विकासानंतर, या ठिकाणी पोहोचणे आणि येथे राहणे खूप सोपे होईल. परदेशी पर्यटकांना लक्षात ठेवून, येथील विकास देखील त्याच पद्धतीने करतील.

