रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जगन्नाथ रासवे सरांना महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी मुंबई येथे 5.30 वाजता प्राध्यापक जगन्नाथ रासवे यांना बहाल करण्यात येणार आहे.
प्राचार्य जगनाथ रासवे यांनी समाजातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे. जसा एक मूर्तिकार दगडाला आकार देऊन मूर्ती घडवण्याचं काम करतो तसेच आपले जगन्नाथ रासवे यांनी विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्यांच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य करत आहे. रासवे सरांचा ठसा हा समाजसेवा शैक्षणिक क्षेत्र पत्रकारिते मधून कार्य करताना करताना समाजाला न्याय देण्याचे कार्य सुद्धा वाकण्याजोगे आहे.
श्री संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री माऊली कौशल्य विकास संस्था सावरगाव व श्री माऊली कौशल्य विकास संस्था आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना या संस्थेतून आतापर्यंत सुमारे 2000 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आतापर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, रेल्वे विभाग, इरिगेशन या ऑर्गनायझेशन मध्ये शासकीय सेवेत आतापर्यंत 300 विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी प्रदान झाली.
गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुमारे 200 विद्यार्थी लायसनधारक झाले. कृषी कंपनीमध्ये सुमारे 200 विद्यार्थी यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. महावितरण व महापारेषण कंपनीमध्ये साठ विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन अधिकृत पत्रकार डिप्लोमा कोर्स पूर्ण करून विविध चॅनलमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये रिपोर्टर म्हणून, काही विद्यार्थ्यांनी अँकर म्हणून, काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे न्यूज पेपर स्वतःचे यूट्यूब चैनल स्वतःचे पोर्टल रजिस्ट्रेशन करून राष्ट्राच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचे काम आज करत आहे व बऱ्याच प्रशिक्षित पत्रकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. सुमारे 100 विद्यार्थ्यांनी क्रॉप टीचरचा डिप्लोमा घेऊन विविध शाळेत कला टीचर म्हणून कार्यरत आहे. प्राध्यापक जगन्नाथ तुकाराम रासवे समाजसेवा करताना खाली संस्थेवर कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून सुद्धा समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवला आहे.
संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जगन्नाथ तुकाराम रासवे यांनी दैनिक युवक आधार मराठवाडा विभागीय संपादक, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संघटक, कौशल्य विकास फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, सुकाणू समिती महाराष्ट्र राज्य सदस्य, जालना जिल्हा कौशल्य जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ प्राध्यापक मराठवाडा कार्याध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद परतुर तालुका अध्यक्ष, शिक्षक परिषद परतुर तालुका अध्यक्ष, श्री माऊली कौशल्य विकास संस्था संस्थापक अध्यक्ष इतर संस्थेमध्ये समाजसेवेचे कार्य करत आहेत. म्हणून सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती व सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान तर्फे प्राध्यापक जगन्नाथ तुकाराम रासवे सरांना साने गुरुजी राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येत आहे.

