मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक भारत विद्यालयात वसंत पचमी उत्सवा निमित्य विद्यालयातील वर्ग 5 ते 12 चे सर्व विद्यार्था यांच्या सर्व शिक्षक शिक्षिका व कमर्चारी यानी देवी सरस्वतीचे पूजन करून जास्त समर्पन निधी अर्पण केला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक किशोर चवरे म्हणाले समाजातील वनवासी भागातील शिक्षणापासुन दूर असलेले अभावग्रस्त, शोषित वर्गातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ही समर्पण राशी विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था मार्फत विविध वनवासी भागातील शिक्षणाचे काम पवित्र करणाऱ्या संस्थाना प्रदान करण्यात येतो. विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था उददेशातंर्गत वनवासी भागातील वनवासी विद्यार्थी बंधु भगिनीना राष्ट्राच्या मुख्य विचारधारेच्या प्रवाहात आणण्याकरिता अश्या विविध कल्याणकारी योजना विद्याभारती मार्फत केल्या जातात.
यावेळी कु.हर्षाली वरोकर यानी वसंत पचंमी महत्व् विशद करताना म्हटले देवी सरस्वती ही विद्या, बुद्धी, ज्ञान, संगीत आणि कलेची देवी मानले जाते. देवी सरस्वती च्या वीणाच्या सुरांमुळे पृथ्वी वरील सर्व जीव- जंतूं ना वाणी सह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. यावेयाप्रसंगी मुख्याध्यापक हरिष भट्टड उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, शिक्षिका राजकन्या चुडे, कु.हर्षाली वरोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा कोंडावार यानी केले.

