अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेकापूर ते वेणी रोडवर २ फेब्रुवारीला साडेअकरा वाजताच्या सुमारास टाटा एस मधून उतरताना पडल्याने रोडवर दगडाचा डोक्याला मार लागून सक्षम देवेंद्र नौकरकार वय १० याचा मृत्यू झाला, तर कार्तिक यादव शिवणकर वय १२ वर्षे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आज ३ फेब्रुवारीला पोलिसांकडून प्राप्त झाली.
प्राप्त माहितीनुसार शेकापूर बाई येथील विपुल मरसकोल्हे यांच्या टाटा एस क्रमांक एम एच 32 क्यू 5130 हा परसोडा रीठ येथे गावातील दहा-बारा लोकांना सोडून परत येत असताना त्याच्या चालत्या गाडीमध्ये मागच्या डाल्यामध्ये सक्षम वय 10 वर्ष व कार्तिक वय 12 वर्ष असे चढले. काही अंतरावर पुन्हा गाडीतून खाली उतरताना खाली पडल्याने सक्षम याच्या डोक्याला मागच्या बाजूने मार लागला व कार्तिक याच्या हनुवटी जवळ तसेच डोक्याला मार लागला. विपुल मरसकोल्हे याने मागे जाऊन पाहिले असता सक्षम हा बेशुद्ध अवस्थेत होता व कार्तिकला मार लागल्याने तो रोडवर पडून होता. विपुल मरस्कोल्हे यांनी दोघांनाही गाडीत बसून शेकापूर बाई येथे आणले व तिथून पुढे ग्रामीण रुग्णालय वडणेर येथे आणले असता डॉक्टरने सक्षम यास तपासून मृत घोषित केले. आणि कार्तिक यादव शिवणकर वय 12 वर्षे याला सेवाग्राम हॉस्पिटल येथे पाठविले.

