प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील कामगारांना होत असलेल्या असुविधा तसेच कंपनी व्यवस्थापनाकडून होत असलेल्या अन्यायकारक भूमिकेबाबत कामगारांच्या तसेच कामगार संघटनेच्या अनेक तक्रारीअंबिका हिंगमीरे यांना प्राप्त झाल्यानंतर आज कामगार अधिकाऱ्यांशी भेटून कामगारांच्या समस्या अवगत करून दिल्या.
यावेळी कामगारांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देणे ही कंपनीची प्राथमिकता असतांना देखील कंपनी कामगारांना सुविधा देण्यास असमर्थ असल्याची तक्रार कामगार अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर कामगार अधिकारी यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क करून त्यांना अवगत केले तसेच तातडीने कामगार निवडणूक लावण्याच्या सूचना देखील दिल्या. कामगारांच्या प्रश्नांवर श्रमिक कामगार संघटना नेहमीच सक्रिय असते. कंपनीने यापुढे कोणत्याही प्रकारची हयगय केल्यास मी स्वतः आंदोलनात्मक भूमिका घेईल हे कंपनी व्यवस्थापनाने लक्षात घ्यावे. अंबिका हिंगमीरे अध्यक्षा श्रमिक कामगार संघटना

