उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:– बौद्ध धर्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी सात वाजता प्रथम प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष जितेंद्र कोलप, विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप व वानखडे सर यांनी प्रथम आपले आदर्श यांची धूप दीप पुष्प यांनी पूजन करून त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहाराच्या संचालिका अवंतिका वाघमारे यांनी पाहुण्यांची ओळख आणि प्रास्ताविक केले.
माघ पौर्णिमेनिमित्त बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच माघ पौर्णिमेचे महत्त्व व बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा यावरती भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र कोलप यांनी प्रबोधन केले. आपल्या प्रबोधनात ते म्हणाले संत रविदास यांनी मानवतावादी शिकवण दिली. माणूस हा बौद्ध धम्माचा केंद्र बिंदू आहे तो मानूनच आपण जीवन जगले पाहीजे. संत रविदास यांनी दोहे, भजन व निर्गुणकार काव्य दिली, सर्व भारतीयांना आपल्या साहित्याची ओळख करून दिली.
ते पुढे म्हणाले की, संत रोहिदासांना संपूर्ण भारतभर 16 नावानी रविदासांना ओळखलं जाते, महाराष्ट्रातल्या वेरूळच्या लेणी मध्ये रविदासांची प्रवचने, काव्य लिखाण तसेच त्यांची प्रवचन झालेली आहेत. मनुवादी व्यवस्थेविरुद्ध माणसाला केंद्रबिंदू म्हणून अनेक अंधश्रद्धा तसेच काल्पनिक असलेल्या कथा यावर त्यांनी प्रहार केलेला आहे. आणि समाज प्रबोधन करून तुम्ही चामके, मै भी चामका, चामका हे जग सारा, चाम बिना कौन बना, रविदास पूछे संसारा. प्रत्येक मानसाच शरीर जर चामड्याचा असेल, कातड्याचा असेल, तर मानसा मानसात जातीभेद का केला जातो. तत्कालीन जातीय व्यवस्थांचे निर्मूलन करण्यासाठी व्यवस्थेचे विचाराचे प्रहार करण्याचे धाडस फक्त रविदास यांच्या दोह्यावरूनच सिद्ध होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि रविदासांच्या विचारांचे नातं किती सृजनात्मक जोडले आहे हे लक्षात येते. संत तुकारामांचे विचारांचे नातं जोडले आहे आणि म्हणूनच संत रविदासांची दिल्ली येथे 555 जयंती 15 फेब्रुवारी 1953 ला बाबासाहेब आंबेडकरांनी केली एवढेच नव्हे तर बाबासाहेबांनी लिहिलेला ‘दि अनटचेबल्स’ हा ग्रंथ संत गुरु रविदासांना अर्पण केला आहे. पंधराव्या शतकात वेदशास्त्र व पुराणावर संत रविदास यानी प्रहार केला तसाच प्रहार माणसाला माणूस म्हणून न मानणाऱ्या वेद शास्त्र आणि पुराणावर बाबासाहेबांनी उदाहरण आणि प्रमाण देऊन दाखल्यास प्रखर पणे विचार मांडून त्यांचे विचार किती अनैतिक आणि समाज विघातक आहेत हे समाजाच्या लक्षात आणून दिले आहेत. माणसाने माणसाशी माणुसकीचे नाते समाजाशी जोडले पाहिजे. माणूस जाती-धर्मात आणि संप्रदायामध्ये विभागण्यापेक्षा माणसाला माणूस पाहिले पाहिजे आणि म्हणूनच माणसाची मने स्वच्छ, करुणा, दया, प्रेम शांती यांनी भरलेली असणे आवश्यक आहे. मानसाच्या मन दुरुस्तीचे काम केलं पाहिजे जाती वादामुळे माणूस माणसापासून वेगळा होतो तर भक्तीभावाने समाज कल्याणाचा मार्ग होतो म्हणून मानवा बद्दल आदर ठेवा आणि जो आदर ठेवतो तोच महान होतो, लोकांच्या मनावर राज्य करतो.
संत साहित्या मध्ये बौद्ध धम्माचा प्रभाव असल्या कारणाने सर्व संतांनी भगवान बुद्धांचे आचार विचार आणि उच्चार घेतलेले आहेत. संत चोखोबा पासून ते संत गाडगे महाराज सर्वच संतावर बुद्धांच्या विचारांचा प्रघाड प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. माघ पौर्णिमेचे बौद्ध धर्मा मध्येअत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विषयी बोलत असताना ते म्हणाले वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावरती बांधलेला स्तूप, चिनी प्रवासी युवांग सॉंग यांनी 1898 मध्ये याचा शोध लागला मातीच्या ढिगार्या खाली भाजलेल्या विटा सारखा हा स्तूप होता. याच पौर्णिमेला बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली वैशालीच्या चापाळ विहारात आराम करताना तथागत भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात “आनंदा आज पासून तीन महिन्याने म्हणजेच वैशाख पौर्णिमेला माझे महापरिनिर्वाण असेल” अशी घोषणा त्यांनी केली भगवंतांच्या प्रेमापोटी वैशालीचे लिच्छवी लोक भगवान बुद्धांचे ही घोषणा ऐकून आता बुद्ध कधीही वैशालीला येणार नाहीत बुद्धाचे दर्शन होणार नाही म्हणून भगवान बुद्धांच्या पाठीमागे जात होते, त्यावेळेला भगवान बुद्धांनी या लिच्छीवींच्या प्रेमापोटी वैशाली नगरीला, 80 वर्षाचा असे पर्यंत जे भिक्षापात्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतले होते ते भिक्षापात्र लिच्छवींना दान केले. तो दिवस माघ पौर्णिमेचा दिवस आहे. तसेच वैशालीचे अंतिम दर्शन ज्यावेळेला भगवान बुद्ध राजगृह गृध्रकुट येथून नालंदा पाटलीग्राम येथून कोटी ग्रामनादीका येथे आले आणि कुसुमावती नदीच्या घाटावरील ठिकाणी ते उभे राहिले आणि वैशाली नगरीचे दर्शन त्या उंच टेकड्या वरून त्यांनी वैशालीचे शेवटचे दर्शन घेतले. माघ पौर्णिमेलाच आनंद महास्थवीर यांचे वैशाली नगरी व राजगृह नगरी यांच्या मध्येच महापरिनिर्वाण झाले. माघ पौर्णिमेच्या दिना दिवशीच अशा चार ते पाच कारणांनी माघ पौर्णिमा प्रसिद्ध झाली.
ते पुढे बोलताना म्हणाले, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता आपण काय केले पाहिजे प्रत्येक माणसाने स्वतः सुधारलं पाहिजे, स्वतः धम्मा आचरण केलं पाहिजे, बौद्ध धम्माचा पाईक बनलं पाहिजे आणि आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाला सुद्धा त्या पद्धतीने बौद्ध धम्माचा आचरण शिकवलं पाहिजे. माणूस सुधारला तर आपलं घर सुधारतं घर सुधारलं तर शेजारी सुधारतो शेजारी सुधारला तर समाज सुधारतो आणि समाज सुधारला तर दुसरा समाज सुधारतो आणि दुसरे समाज सुधारले तर गाव सुधारतो गाव सुधारला तर तालुका सुधारतो तालुका सुधारला तर जिल्हा सुधारतो जिल्हा सुधारला तर राज्य सुधारतं आणि राज्य सुधारलं तर देश सुधारतो आणि देश सुधारला तर विश्व सुद्धा आपण बदलू शकतो ही ताकद बुद्धच्या वाणीत होती. बुद्ध हे एकटेच होते पण बुद्धाच्या धम्माचा प्रसार साता समुद्राच्या पलीकडे झाला आणि म्हणून ही ताकद प्रत्येकाच्या असली पाहिजे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपण या बौद्ध धम्मासाठी वाहून घेतलं पाहिजे आणि या धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे, बौद्ध धम्म वाढीकरिता प्रत्येकानी काम केल पाहिजे. माणसं असतात पण प्रत्येकाने मी का करू म्हणत बसू नये, आपल्याला जे काही ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा वापर अज्ञानी लोकांच्या मनात सज्ञानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न कसा कराता येईल यासाठी करावा. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी अहोरात्र प्रत्येकाने झटावे, बौद्ध धर्म संस्कार, बौद्धांचे संस्कार, बौद्धांनी काय करावे काय करू नये, जुन्या रूढी परंपरा लाथाडून आपण बौद्ध रीतीरीवाजाप्रमाणे आपले संस्कार करावेत माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या अंतिम क्षणापर्यंतपर्यंत जे जे संस्कार आहेत ते बौद्ध संस्कार प्रमाणेच व्हावेत आजच्या पिढीकडे आपण जर पाहिले तर बौद्ध संस्काराला अनुसरून पिढी वागत नाही, दुसऱ्या धर्माच्या संस्कृतीशी जवळीक साधते चालू उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हळदी कार्यक्रम नसतानाही तो आपल्यात आणला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. कोणी मयत झाले तर रक्षा विसर्जन कार्यक्रमाला सुद्धा दुसऱ्या धर्माच्या संस्कार रूढी परंपरे प्रमाणे अनेक ठिकाणी केल्या जात आहेत ही शोकांतिका आहे अशा प्रवृत्तींना योग्य वेळीच आळा घालणे ही काळाची गरज बनली आहे . ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी प्रत्येकाने बौद्ध अनुयायी यांनी कोणावरही टीका टिप्पणी न करता प्रबोधन हे शांती संयमाने करणे आवश्यक आहे. जातीय तेढ निर्माण होणार नाही अभद्र हिंसात्मक होणाऱ्या गोष्टींना विरोध करून बौद्ध संस्कृतीचे जतन कलात्मक दृष्टीने केले पाहिजे. तरच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होऊ शकतो. बौद्ध विनय आणि बौद्ध आचरण या करिता भगवान बुद्धांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याचबरोबर साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेले आहेत तर या 22 प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन प्रत्येकाने केले तरच आपण बौद्ध म्हणून गणले जाऊ, बौद्ध धम्माच्या विसंगत जर आपण वागू लागलो आणि आपापसात वैचारिक मतभेद करत राहिलो तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला दिलेला बौद्ध धम्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही, आपण स्वतः कारणीभूत होऊन इतिहासात आपल्या पिढीची अशी नोंद होईल. म्हणून आत्ता सध्याची परिस्थिती रात्र वै-याची आहे असं म्हटलं जायचं पण आता दिवस वैऱ्यांचा आहे असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षण आणि क्षण वैऱ्यांचा आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने बौद्ध धम्माचा जागर करून अभियान राबवणे आवश्यक आहे.बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे असे विचार जितेंद्र कोलप यांनी व्यक्त केले.
यावेकी विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर घोलप यांनी आपले विचार व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानून धम्मपालन गाथा संपल्यानंतर
भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती केली. तसेच ख्रिश्चन समाजाचे धर्मप्रसारक एसैय्या तालुरी भगवान बुद्ध अँड इज धम्मा ग्रंथाचे वाचन केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असून ते बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अशीच सर्वांनी प्रेरणा घ्यावी तसेच त्यांनी स्वखर्चाने 500 संविधानाच्या प्रति त्यांच्या धर्मातील लोकांना वाटप करून बौद्ध धम्म स्विकारण्या बाबत प्रयत्न प्रबोधन करीत आहेत. तसेच सुमारे 5000 लोकांची धम्म परिषद घेण्याचा त्यांचा विचार असून त्यांना सहकार्य करण्याचे आव्हान डॉ. सुधीर कोलप यांनी केले.
यावेळी विहाराचे सहखजिनदार यांनी नवीन फोर व्हीलर कार खरेदी केल्याबद्दल त्यांना विहाराच्या वतीने शुभेच्छा विहाराचे संचालक सी.बी. चौधरी यांनी दिल्या. त्यांची प्रगती अशीच उत्तर उत्तर अशीच प्रगती मध्ये वाढ होण्याबाबत मनोकामना व्यक्त केली. त्यानंतर सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी दान पात्र सर्वांपर्यंत पोहोचवून सर्वांना दान देण्याबद्दल सब्बे सत्ता सुखी होन्तु या गाथा गात विनंती केली. अमोल सरकार नेहमीच पौर्णिमेला विहारास दान देत असतात. याही पौर्णिमेला त्यांनी अर्थ दान दिले. त्यांचा आणि कांबळे ताई यांचा सत्कार अध्यक्ष व सह खजिनदार यांनी केला.धम्म पालन गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास विहरा मध्ये सर्व उपासक/ उपासिका बंधू माता, भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने संचालिका दिपाली कांबळे, मा.अध्यक्ष यांच्या सोबत त्यांच्या सुविध्य पत्नी, त्यांची कन्या, भगिनी मोरे सर्व कुटुंब, आठवले आणि धनवडे संपूर्ण कुटुंब दांडे सर त्यांचे सर्व कुटुंब, नरवाडे सर, खीर दान दिलेल्या कांबळे ताई, उपोसथ व्रत धारण केलेल्या कांबळे अमोल सरकार व त्यांचे कुटुंबीय, सुहास धोत्रे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शहाजी साबळे सर धामणीचे कोलप साहेब व गावातील सहकारी यांनी विहाराचे पुढील योजना साठी जरूर ते सहकार्य आणि मदत करण्याची ग्वाही दिली.

