सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गाडी क्रमांक 20101/ 20102 नागपूर-सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत कायमस्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सुधारित डबा संरचना 19 फेब्रुवारी 2025 पासून नागपूर (NGP) आणि सिकंदराबाद (SC) येथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी लागू होईल.
यापूर्वी, नागपूर-सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी 20 डब्यांच्या एकूण संरचनेसह चालवली जात होती, ज्यामध्ये TSTC (ट्रेलर कोच विथ पँटोग्राफ), TSNDTC (नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच), TSMT (मोटर कोच) आणि TSTDC (ड्रायव्हिंग ट्रेलर कोच) हे डबे होते.
संशोधित संरचनेनुसार, आता ही गाडी 8 डब्यांच्या एकूण संरचनेसह चालवली जाईल, ज्यामध्ये TSMC (मोटर कोच), TSTC (ट्रेलर कोच) आणि TSNDTC (नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच) हे डबे असतील.
प्रवाशांसाठी माहिती व सार्वजनिक घोषणा:
ज्या प्रवाशांनी आधीच तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांना SMS द्वारे माहिती दिली जाईल. रेल्वे स्थानकांवर आणि आरक्षण केंद्रांवर सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली द्वारे ही माहिती जाहीर केली जाईल. प्रवाशांना याबाबत जागरूक करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सूचना लावल्या जातील. मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना विनंती करते की त्यांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाची योजना तद्नुसार करावी.

