उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणाले होते की” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” परंतु सांध्याचा काळात शिक्षण हे पैश्याचा बाजार होऊन बसलेले असून त्यात खाजगी क्लासेस व खाजगी अकॅडमी ह्या माध्यमातून IIT, NEET, JEE, CET व NDA च्या परीक्षेची तय्यारी करण्या करीता आम्हीच योग्य पर्याय आहोत अशी खाजगी अकॅडमी कडून मोठमोठे डिजिटल बॅनर लावून विद्यार्थी आणि पालक यांना आकर्षित केले जात आहे.
अनेक डिजिटल मधील उत्तम आणि चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी हे स्थानिक व येथील असतील का याची सुद्धा शंकाच आहे. विद्यार्थ्यांनी मोठ मोठे गुण मिळवलेले दाखवून त्यांना आकर्षित केले जात आहे पालक आणि विद्यार्थी यांची फसवणूक आणि आर्थिक शोषण सुरू आहे या अश्या खाजगी क्लासेस व खाजगी अकॅडमीची फी लाखोच्या घरामध्ये असून त्यामाध्यमातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. शिक्षण मात्र सर्वसाधारणपणे असते विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अकॅडमीमध्ये घेऊन त्यांच्यासोबत कॉलेजला ऍडमिशन दाखवले जात आहे आणि ती मुलं हजर फक्त अकॅडमी मध्ये राहतात आणि कॉलेज मध्ये हजेरी लावली जात आहे.
या खाजगी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांकडून फक्त IIT, NEET, JEE, CET, NDA चा अभ्यास करून घेतला जातो बारावीच्या अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्षित होतो आणि बारावीचे पेपर आले की विद्यार्थी पूर्ण मानसिक तणाव मध्ये जातात आणि ते बारावी पास होतील की नाही याची सुद्धा शंका वाटत राहते. आणि अनेक विद्यार्थी बारावीच्या निकालामध्ये ५०% गुणा च्या घरामध्ये सुद्धा पोचू शकत नाही त्यामुळे त्यांना NEET, JEE सारख्या परीक्षा सुद्धा देता येत नाही या मानसिक तणाव मध्ये विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलत आहेत त्याचं एक उदाहरण सध्या मिरज मध्ये घडलेले आहे मिरज मधील प्रथमेश बाळासाहेब बिराजदार नावाचा बारावी सायन्स शाखेचा विद्यार्थी बारावीच्या पेपर आधीच आत्महत्या केलेले घटना घडली आहे तो मालकनावर अकॅडमी मध्ये शिकत होता तिथे तज्ञ शिक्षक अभावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेची न झालेली तयारी, अकॅडमी चे तनाव ह्या सर्व मानसिक तणावमुळे त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी अकॅडमीची चौकशी व्हावी तिथे शिक्षण देत असलेल्या शिक्षकांच्या गुणवत्तेची, त्यांच्या शिक्षणाची चौकशी करावी आणि त्या अकॅडमी वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांची आत्महत्येची घटना पुढील काळात घडू नये याकरिता आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व खाजगी क्लासेस अकॅडमी यांची मागील दोन-तीन वर्षाची पूर्णतः चौकशी करावी आणि अयोग्य खाजगी क्लासेस अकॅडमी बंद करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी प्रशांत कदम, मानतेश कांबळे, एम.जे. पाटील, अमीर मुजावर, बादशाह बागवान, सोहेल ककमरी, वसंत भोसले आदी उपस्थित होते.

