अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वैयक्तिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिक लाभाचा व्यवसाय मिळावा, या अनुषंगाने मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दि. २० फेब्रुवारी रोजी इसीजीसी कमिटी असोसिएशन व CEAT Tyres कंपनी तर्फे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचा प्राथमिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना कॅम्पस मध्ये मुलाखतीसाठी आमंत्रित करून आणि त्यांची नियुक्ती करून रोजगार सुरक्षित करण्याची संधी उपलब्ध करून देणे होता. सदर कार्यक्रम विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक, इ.सी.जी.सी कमिटी प्रमुख प्रा.राकेश लोणकर, ॲलुमीना असोसिएशन प्रमुख वैशाली तडस तसेच CEAT प्लांट असिस्टंट मॅनेजर मानसी गवळी व मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह HR अभिजीत कुईके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक यांनी केली तसेच मानसी गवळी यांनी विद्यार्थ्यांना संभाव्य नोकरीच्या संधी शी संपर्क साधून शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी प्रभावीपणे भरून काढणे आणि नियुक्त केलेल्या विद्यार्थिनींना आवश्यक असलेले संबंधित कौशल्य विकसित कसे करता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनुश्री भोयर यांनी केले व अतिथींचे आभार प्रा.श्रद्धा बोरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. प्रणिता आष्टणकर, प्रा. तेजस्विता सहस्त्रबुद्धे, रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनुश्री भोयर, प्रा. कोमल नांदूरकर, प्रा.अंबिका ठवरी वनस्पती शास्त्र विभागातील प्रा. दर्शना रेंढे, प्रा. हर्षदा राऊत, प्रा. वैदर्भि घुंगरूड, भौतिकशास्त्र विभागातील प्रा. स्नेहा सांगोले, प्रा. रोहिणी बोरकर, प्रा.समीक्षा पवार, गणितशास्त्र विभागातील राकेश लोणकर, प्रा. किरण कष्टी, प्रा. मयुरी धोंडे व संगणक शास्त्र विभागातील श्रद्धा बोरकर यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाला मातोश्री महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी व हिंगणघाट क्षेत्रातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

