अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रक्ताच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचे नाते मोठे असते असे म्हणतात. नगर परिषद कॉलनी हिंगणघाट येथील रवी मारशेट्टीवार हा घरचा एकटाच कामावणारा परंतु त्याला काही महिन्यापूर्वी लकवा मारल्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत खिळखीळी झाली होती. त्याच्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य सुनील रिठे मित्र परिवार यांनी आपल्या जुन्या मित्राच्या कुटुंबाला या संकटकाळी एक महिना पुरेल एवढा किराना घेऊन दिला. यावेळेस मित्रांनी केलेल्या मदतीसाठी रवी मारशेट्टीवर व त्यांची आई यांनी आभार माणले. यावेळेस सुनील रिठे मित्र परिवारातील निलेश सावंकार, उमाकांत रिठे, विकास भुते, पियुष मस्के, शाम जाधव, सतीश गौळकार इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.

