अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भारतीय जनता पार्टी सावनेर तालुकाध्यक्ष मंदार दादाराव मंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी २० फेब्रुवारीला सकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा यथोचित सत्कार व स्वागत करण्यात आले.
स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय म्हणजे हक्काचं ठिकाण असेल. नागरिकांना आता सहज भाजपा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून कामे मार्गी लावता येणार आहे. असे भारतीय जनता पार्टी सावनेर तालुकाध्यक्ष मंदार दादाराव मंगळे यांनी म्हटले.
यावेळी आमदार डॉ.आशिष देशमुख, डॉ.राजीव पोतदार, रामराव मोवाडे, राजू घुगल, डॉ.विजय धोटे, रवींद्र ठाकूर, तुषार उमाठे,कुलभूषण नवधिंगे, नरेंद्र ठाकूर, सुजित बागडे, राजू भुजाडे, आशिष फुटाणे, महेश चकोले, राहुल दाते, पंकज भोंगाडे, रत्नाकर ठाकरे, पिंटू सातपुते, प्रज्वल कांबळे, मोहन कानफाडे, अभिषेक सातपुते उपस्थित होते.

