पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शिवसेना प्रवक्त्या संपर्क नेत्या, आमदार डॉ. मनिषा ताई कायंदे, विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी च्यावतीने आज सिताबर्डी येथील गांधी चौकात जिल्हाप्रमुख मनिषा पापडकर यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या संबंधित महिला विषयी वापरलेल्या अपशब्दाच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात नागपूर शिवसेना महिला आघाडीतर्फे त्याच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
अ.भा.मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर विधान परिषद आमदार उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना मर्सिडीज गिफ्ट केल्याशिवाय पद मंत्रीपद, निवडणूक तिकिटा दिल्या जात नाही असे संबोधले आणि यावरून संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांना अतिशय खालच्या दर्जाची शिवीचा वापर करून महिलांचा अपमान केलेला आहे. या आधी सुद्धा नारायण राणे यांनी यांच्यावर आरोप केलेले होते की यांच्या विहिरीमध्ये कितीही पाणी टाकले तरी विहीर ही कोरडीच राहते. ती कधीही भरत नाही तसेच खुद राज ठाकरे यांनी याआधी यांच्यावर टीका केलेली आहे. यांना कितीही खोके दिली तरी कमी पडतं याला यांना खोके नाही तर कंटेनर द्यावं लागतं तरी यांचा समाधान होत नाही दीपक केसरकर, रामदास कदम यांनी सुद्धा याआधी आरोप केले परंतु यांचं खंडन शिवसेना उबाठा गटातील लोकांनी केलेलं नाही, परंतु नीलम गोऱ्हे या बोलल्यानंतर यांच्या बुडाला आग लागली आहे. कारण सत्य परिस्थिती गोऱ्हे यांनी मांडली सर्वसामान्य कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो व जे पैसे घेऊन येतात त्यांना वरची पद व निवडणूक तिकिटा वाटल्या जातात हा कार्यकर्त्यावर झालेल्या अन्याय आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यावर कधीही अन्याय होऊ दिला नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना नेते मंत्री केले परंतु आता परिस्थिती खूप विरोधात्मक आहे.
आजच्या परिस्थितीला कार्यकर्ता हा फक्त सतरंज्या उचलण्या पुरताच राहिलेला आहे आणि जे पैसे पुरवतात त्यांना तिकीट वाटप करतात इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण यांच सुरू आहे या नीलम गोऱ्हे यांनी या विषयावर प्रकाश टाकला आणि संजय राऊत यांच्या बुडाला आग लागली परंतु नागपूर शिवसेना महिला आघाडी अतिशय आक्रमक पद्धतीने यांचा निषेध केलेला आहे. यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केलेला आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा नागपूर शहरातील यांच्या कार्यालयाला काळे फासले जाईल असा दम शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख यांनी दिला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश तिघरे उपजिल्हा संघटिका मंजुषा पानबुडे, शहर प्रमुख पूनम चाडगे, मनीषा पराड, नरेश मोहाडीकर, मीना जालेकर, लता बर्डे, शिल्पा थोटे, सोहा मसराम, निर्मला कांबळे, माधुरी, खेमचंद कथले, मनोज गुप्ता, दिनेश निमजे, अनुराग मिश्रा यावेळी उपस्थित होते.

