अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर तालुक्यात सातपुडाच्या पर्वत रांगेतील ‘खडक नदी’, ‘निर्मला नदी’ व ‘जटा नदी’ यांच्या त्रिवेणी संगमातून ‘अंबाडोह’ नदी तयार झाली. या नदी संगम काठावर ‘बोरगांव जंगली’ हे खूप पुरातन गाव वसलेले होते. नदीवर सन १९६० ला उमरी डॅम/धरण बांधले गेले. तेंव्हापासून नदी काठाने राहणारे बोरगांव मधील कुटुंब/नागरिक यांनी आपले घरेदारे, शेतीवाडी सोडून दुसरीकडे पलायन केले. तेथील नागरिक हे सिंधु संस्कृतीचे ‘आद्य दैवत शंकर’ यांचे पूजक होते व तिथे स्वयंभू दगड/मूर्ती होती. त्याला ‘जंगली महादेव’ म्हणुन त्याची पूजा करत होते असे सांगण्यात आले होते.
ह्यावर्षी परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन शिवधाम येथे जंगली स्वयंभू महादेवाची पुनर्स्थापना व महाशिवरात्री महोत्सव दि. २५ ते २७ फेब्रुवारी ला आयोजित केला. या महोत्सवात उमरी,नांदागोमुख,सावळी, जटामखोरा,पंढरी, नरसाळा,तेलगाव,कामठी, सोनाली, जैतपुर, नांदीखेडा, मांडवी, सावरगाव, बाबुडमेट, पानउबाळी, सोनखांब, मसोरा, तिष्टी (बु), तिष्टी (खू), जोगा, छत्रापूर, झिलपा या गावातील भजन दिंडी मंडळी व भाविक सहभागी झाले होते. यावेळी परिसरातील दहा कलाकारांनी शिवतांडव नृत्य सादर केले. दोन महिलांच्या अंगात देवी संचारल्या त्यामुळे जंगली महादेव जागृत असल्याचे भाविक बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.डॉ. अभिविलास नखाते, प्रा.डॉ सुनील डोंगरे, प्रा. डॉ. उपेंद्र महात्मे, इंजी. नरेंद्र गद्रे, श्री यशवंतजी कुथे, प्रा. सुनील घुगल, विनोद घुगल, योगराज धानोरकर, कांचन ढवंगडे, रतन लोखंडे, सुभाष खंगार, मधुकर माहुरतले, पंकज ढेंगरे, पंकज जुनघरे, सचिन पराये, प्रणाली ढोक, गंगा मांडवकर, नीलिमा बाळापुरे, श्रद्धा पुन्डेकर, भक्ती खडसे, सुजित मेश्राम, बबलू मेश्राम, रवी वर्मा, पुरुषोत्तम आसोले, मधु भगत, पवन निमकर, अंकुश वैद्य, सागर घुगसे,सुरज उईके, निखिल कचडे, धीरज राऊत, मनोज वट्टी, विनोद मोहतकर, सुरत झाडे, सागर खोंडे, निलेश मडके व पंचक्रोशीतील बरेच नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विदर्भातील काही संस्था व नागरिकांनी यास शुभेच्छा व सहकार्य केले. यावेळी हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. पुढे नागपंचमी यात्रा, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवावे असे उपस्थित भाविकांनी सुचवले.

