Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 3, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शेतक-यांच्या प्रश्नांवर काॅग्रेस आक्रमक : चंद्रपूरात शेतकरी सन्मान धरणे आंदोलनात हजारोंची उपस्थिती.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारतात शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतमालाला भाव नाही, शेती साहित्य, खते, कीटकनाशके यावर वारेमाप जिएसटी, कर्जाचे थकलेले हप्ते, दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत, शेतकरी आंदोलनाची दखल न घेणे, लाडकी बहिण, संजय गांधी निराधार योजनेतून निकष लावून अनुदान बंद करणे, देशात – राज्यात वाढता गुंडाराज, अराजकता, महापुरुषांचा अपमान, महिला सुरक्षा धोक्यात, वाढती महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात अशा अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. ३ मार्च २०२५ ला सकाळी ठिक ११ : ३० वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे हजारोंच्या उपस्थित धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी बांधव हा अकारण भरडला जात आहे. त्यामुळे कृषिप्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने शासनाने तातडीने पुर्ण करावीत यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार शेतकरी सन्मान धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हातील सहाही विधानसभा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार केला. सरकार विरोधात आणि शेतकरी, गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी घोषणा करण्यात आल्या.

या प्रसंगी चंद्रपूर जिल्हाचे काँग्रेसचे निरीक्षक मुजीब पठाण, जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष रीतेश तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनोद दत्तात्रय, चंदाताई वैरागडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शरह जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, दिनेश चोखारे, संतोष लहामगे, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे, घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, विजयराव बावणे, किसान काँग्रेसचे भालचंद्र दानव, तालुकाध्यक्ष अनिल नरुले, नितीन गोहणे, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, मिलिंद भोयर, रमाकांत लोधे, विजय गावंडे, गुरू गुरूनुले, देविदास सातपुते, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, वासुदेव पाल, गोविंदा उपरे, अब्दुल करीम, विलास टिपले, अवधूत कोट्टेवार, भिमराव मडावी, श्यामराव कोटणाके, प्रा. अनिल शिंदे, राजु रेड्डी, एजाज अहमद, घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, नंदकिशोर वाढई, प्रमोद बोरीकर, विमाशी जिल्हा कार्यवाहक सुनील शेरकी, कुणाल चहारे, सुलतान अशरफ अली, प्रशांत दानव, अनुताई देहेगावकर, यासह महिला तालुकाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: Chandrapur congress partyशेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

Next Post

सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण

सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In