Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 3, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सरकारने २०२४ च्या निवडणुकीत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कर्जमाफीसह शेतक-याचा सात-बारा कोरा करण्याबाबद माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत मागणी करण्यात आली.

दिनांक ०३ मार्च ते १० मार्च रोजी होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कर्जमाफीसह शेतक-याचा सात-बारा कोरा करण्यासंबंधी निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनातुन करण्यात आली.

राज्यस्तरीय बॅकर्स कमिटीचा अहवाला नुसार ३० हजार कोटी कर्ज थकीत असलेल्या १५ लाख ४६ हजार शेतकरी कर्जाच्या खाईत पडले असुन अंधकारमय चाकोरीतुन वाटचाल करीत आहे. नैसर्गिक आपत्तीसह शेतमालाचे पडलेले भाव तसेच हमीभाव न मिळल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाच्या खाईत गेला आहेत. महाराष्ट्रातील १ कोटी ३१ लाख शेतक-यापैकी १५ लाख ४६ हजार शेतक-यांच्या डोक्यावरील बॅकाचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतक-यांकडे विविध बॅकांचे ३० हजार ४१५ कोटीचे कर्ज थकीत आहे. राज्यस्तरीय बॅकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

महारष्ट्रात आजही दररोज किमान ७ शेतकरी थकित कर्जाच्या वसुली व जाचापोटीच्या भितीने आत्महत्या करीत आहे. ती संख्या वर्षाकाठी दोन हजारांच्या पुढे जात आहे.ही आकडेवारी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आलेली आहे.शेतक-यांना दिलासा देण्यासाठी व मतांच्या जोगव्यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, महायुती सरकारच्या वतीने तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व त्यांच्या भाजपसह महायुतीने शेतक-यांची कर्जमाफीसह त्याचा सातबारा कोरा करू, असे शेतक-यांना आशासन दिले होते, तर महाविकास आघाडीने त्यांच्या वचननाम्यात शेतक-यांचे 0३ लाखापर्यतचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र अजूनपर्यत कर्जमाफी शेतक-यांना मिळाली नाही तर नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. ही एक शेकांतिका आहे. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींसाठी ४८ हजार कोटीची केवळ एका वर्षासाठी तरतुद केली जाते. मात्र शेतक-यांमध्ये चांगला रोष निर्माण झाला आहे. आज महाराष्ट्रातील शेतक-यांवर १७ जिल्हात मोठया प्रमाणावर शेती कर्ज थकीत कर्ज आहे.

जिल्हानिहाय कर्जाची स्थिती शेतकरी-कर्ज (कोटी) जालना 1,32,370 – 1635 कोटी, बुलढाणा 1,09,502-1048 कोटी, परभणी 1,05,547-1180 कोटी, पुणे 89,132-2312 कोटी, नांदेड 88,565-907 कोटी, यवतमाळ 88, 360-1827 कोटी, वर्धा 69,786-862 कोटी, सोलापूर 67,306-2626 कोटी, धाराशिव 38, 517-911 कोटी, नाशिक 63,385-2857 कोटी, नागपूर 43,696 1012 कोल्हापुर 43,696-1001 कोटी, धुळे 41,946-794 कोटी,दीड 67,710-1152 कोटी, छ. संभाजीनगर 66,044-1281 कोटी, अमरावती 60,638-961 कोटी, अहिल्यानगर 48,283-1284 कोटी ही सर्व आकडेवारी लक्षात घेता सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांची कर्जमाफी सह सातबार कोरा करावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा; माजी आमदार प्रा. राजु तिमांडेमाजी आमदार प्रा.राजू तिमांडेशेतकरी कर्ज माफी
Previous Post

श्री.राम मंदिर ट्रस्टच्या राम मंदिर वार्ड येथील मालमत्तेचे विवरण द्या: उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी.

Next Post

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In