Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 4, 2025
in आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद, कॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षण
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

१७ फेब्रुवारी ते १९ एप्रिलपर्यंत सावनेर-कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचा उपक्रम.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर, जिल्हा परिषद नागपूर (आरोग्य विभाग), नगर परिषद आरोग्य विभाग सावनेर, कळमेश्वर, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी २०२५ ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत चालणाऱ्या या अभियानाचे आयोजक सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख आहेत.

त्यानिमित्ताने, ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे ३ मार्च २०२५ ला कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३७९ संशयित रुग्णांनी आपली तपासणी केली. कर्करोगाची स्पष्ट लक्षणे असलेल्या ४९ रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

आमदार डॉ आशिषराव देशमुख शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, “परिसरातील जास्तीत जास्त लोकांना या कॅन्सरमुक्त अभियानाबद्दल माहिती द्यावी. खर्रा, तंबाखू, सिगारेट, गुटखा यामुळे कर्करोगाची शक्यता बळावते. कर्करोगा बद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असून या जीवघेण्या कर्करोगापासून सावध राहण्याची गरज आहे. कर्करोगासंबंधी लक्षणे आढळल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात. या क्षेत्रातील ०१ लाख घरे आणि ४.५० लाख लोकांपर्यंत आपली चमू पोहचली असून कर्करोगाशी संबंधित लक्षणे असलेल्या लोकांची विविध ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये आपण तपासणी करीत आहोत. मॅमोग्राफी, पॅप स्मिअर तपासणी व्हॅन आणि मुख कर्करोग तपासणी व्हॅन सुद्धा आपण शिबिरात उपलब्ध करून दिली आहेत. सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या उपचार सुविधा आपण प्रदान करू. गरज पडल्यास टाटा सारख्या मोठया कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णाला उपचारासाठी पाठवू. कॅन्सर हा जीवघेणा रोग कोणालाहीं होऊ नये म्हणून संपूर्ण सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र कॅन्सरमुक्त करणे हा माझा मुख्य हेतू आहे.”

“सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील नागरिकांना कर्करोगमुक्त करण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. घातक गर्भाशय कर्करोगावर आळा बसावा म्हणून माझी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून १९ वर्षापर्यंतच्या मुलींसाठी गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरणाची नि:शुल्क सुविधादेखील आपण उपलब्ध करून दिली आहे”, अशी माहिती डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांनी यावेळी दिली.

रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय कोलते यांनी याप्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या या कॅन्सरमुक्त अभियानाची स्तुती केली. डॉ आशिषराव देशमुख हे २०१६ पासून कॅन्सरसंबंधी उपक्रमात लोकांची सेवा करत असून हे ईश्वरीय कार्य आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये डॉ देशमुख एकमेव आमदार आहेत, जे कॅन्सरसारख्या भयानक आजारावर मात करण्यासाठी जीवाचे रान करून कार्य करत आहेत, असे ते म्हणाले.

याप्रसंगी एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनीषा ढोबळे,डॉ.विनय हजारे,एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सामाजिक वैद्यकीय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. अनिरुद्ध देवके,सर्जरी विभाग प्रमुख डॉ.नितीन वासनिक, कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. विवेक हरकरे,स्त्रीरोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ.अनुजा भालेराव,डॉ.संदीप गुजर,डॉ विवेक ठोंबरे,डॉ.वेणूगोपाल रेड्डी, डॉ.राहुल,डॉ.परेश झोपे, डॉ विजय धोटे, डॉ.सुधीर रावलानी, डॉ संदीप खंडाइतकर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. अनेक मान्यवरांनी यावेळी कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले. डॉ अनिरुद्ध देवके यांनी प्रास्तावित केले. पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर ७ मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र बडेगाव येथे संपन्न होईल.

Tags: Savnerआमदार डॉ. आशिष देशमुखकॅन्सर मुक्त भारतकॅन्सरमुक्त अभियानात १ लाख घरे व ४.५० लाख लोकांचे सर्वेक्षणसावनेर येथील कर्करोग निदान व उपचार शिबिराला भव्य प्रतिसाद
Previous Post

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस सदैव पाठीशी: केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारू: सुभाष धोटे.

Next Post

महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध विहारातील सर्व अधिकारी आणि सदस्य आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध विहारातील सर्व अधिकारी आणि सदस्य आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा.

महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध विहारातील सर्व अधिकारी आणि सदस्य आणि बौद्ध समाजाचा पाठिंबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In