श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 व्या वार्षिक उर्सला येणाऱ्या सर्व भाविकांचे श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा ट्रस्ट वाकी तह. सावनेर तर्फे करण्यात येते आहे स्वागत.

अनिल अडकीने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील वाकी येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या 82 व्या वार्षिक उर्सला सुरुवात झाली आहे.
दिनांक 3 मार्च रोज रविवारला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून शाही संदल निघून परम पूजनीय काशिनाथ डहाके पाटील यांच्या वाकी येथील वाड्यात आला. त्यानंतर सायंकाळी संत ताजुद्दिन बाबा दरबारात पोहचला. त्यानंतर परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करून या उर्सला सुरुवात करण्यात आली आहे.
या वार्षिक उर्सचे उद्घाटन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे होते. यावेळी डॉक्टर अशोक जीवतोडे राष्ट्रीय समन्वय ओबीसी महासंघ यांच्या प्रमुख उपस्थिततीमध्ये मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून बाबा ताजुद्दीन यांच्या उर्सला प्रारंभ झाला.
या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 6 मार्चला श्रीमंत राजे रघुजीराव भोसले व श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम होईल.
दिनांक 7 मार्चला सकाळी 10.00 वाजता ह भ प हरिशचंद्र वंजारी महाराज लाडगाव काटोल यांचे कीर्तन होईल. त्यानंतर रात्री 8.00 वाजता स्वरधारा म्यूजिकल ग्रुप मनीष परिहार अशोक अंजाम ताराभाई जबलपुर यांच्या वतीने सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.
दिनांक 8 मार्चला सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत ह भ प कन्हेरकर महाराज मुक्काम चिखलसावंगी जिल्हा अमरावती यांचे किर्तन होईल त्यानंतर रात्री 8 .00 वाजता स्वरांजली ग्रुप ठोसर बंधू द्वारा प्रस्तुत भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 9 मार्चला सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत ह. भ. प गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले श्री संत मानकोजी वंशज श्री क्षेत्र पंढरपूर यांचे गोपाल काल्याचे किर्तन होइल.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसून मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख, आमदार मोहनजी मते, डॉक्टर राजीव पोतदार, अशोक धोटे, मनोहर कुंभारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थितीत या उत्सवाचा समारोप होईल.
उर्स निमित्त परिवहन महामंडळ तर्फे बसेसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच या उर्स मध्ये विविध प्रकारचे दुकाने मनोरंजन पार्क खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेले आहे. तसेच रोज ट्रस्ट कडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. उत्सवादरम्यान भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घ्यावे तसेच भाविकांनी कोठेही गर्दी करु नये भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जदा नशीन श्री प्रभाकर डहाके पाटील यांनी दिली.

