अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विधान परिषदेचे पाच सदस्य नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीत विजयी झाले. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्यानुसार २७ मार्चला मतदान होणार आहे. या दरम्यान सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणणाऱ्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीवजी पोद्दार यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी नागपूर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून पाम कोर्ट लॉन मध्ये झालेल्या बैठकीत झाली.
नागपूर जिल्ह्यात विधान परिषदेच्या दोन आमदारांच्या जागा रिक्त आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर निवडून गेले आहे तर प्रवीण दटके आमदार कोट्यातून निवडून आले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दोन विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत.
नागपूर जिल्ह्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची जागा रिक्त राहणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम ३ मार्चला जाहीर झाला आहे. त्यात नागपूर ग्रामीण नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार प्रवीण दटके यांच्या जागेवर निवडणूक होत आहे. नागपूर ग्रामीण मधून भाजपाच्या खोट्यातून राज्यपरिषद सदस्य डॉ. राजीव पोतदार, अशोक धोटे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अँड.प्रकाश टेकाडे यांची नावे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.डॉ. राजीव पोतदार यांची राजकीय कारकीर्द बघता त्यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना २०१९ मध्ये तिकीट दिली होती मात्र ते पराभूत झाले. मधल्या काळात त्यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे पक्षश्रेष्ठींना कळविले. डॉ. राजीव पोतदार यांनी नेहमी पक्षासाठी त्याग केला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाची त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे पालन केले. नागपूर ग्रामीण भाजपमध्ये डॉ. राजीव पोदार यांची ओळख सर्वसामान्य नेता म्हणून आहे. पक्षासाठी त्याग व बलिदान त्यांनी दिले आहे. त्यामुळे कार्यकर्ता वर्गातून डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषद उमेदवारी देण्याची मागणी केल्या जात आहे.
तेव्हा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषद उमेदवारी बाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी मनोहर कुंभारे ,रामराव मोवाडे,मंदार मंगळे तालुका अध्यक्ष भाजपा, राजीव घुगल शहर अध्यक्ष भाजपा, संदीप उपाध्ये, पियुष बुरडे,इमेश्वर यावलकर, रमेश जैन,दिलीप धोटे,पत्रकार युवराज मेश्राम,प्रमोद हत्ती, धनराज देवके कळमेश्वर शहराध्यक्ष, ४ ही शहराध्यक्ष व त्यांचे महामंत्री, तालुकाध्यक्ष व महामंत्री भारती आटणकर ,तालुकाध्यक्ष मनीष खंगारे, रतन खंगारे, रवींद्र ठाकूर, बाल्या ताजने, राजूभाऊ भुजाडे, दिवाकर नारेकर, आशिष मानकर, पिंटू सातपुते ,महेश चकोले ,सौरभ पटेल ,सचिन विखे, तुषार उमाटे, बापू सुरे, प्रकाश दिवटे, रत्नाकर ठाकरे, मोहन कानफाडे, प्रमोद पारधी, प्रज्वल कांबळे, अभिषेक सातपुते, विशाल दुबे, गोपाल नंदू वानखेडे, माया शंभरकर, एकता पोटभरे, सतीश बनकर, गजू सातपुते सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

