अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिनांक 9 मार्च ला वीरा वॉरियर्स ग्रुपने जागतिक महिला दिन डॉ. बी आर आंबेडकर विद्यालय मधे वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारें साजरा केला.
महिला दिननिमित्त १० दिवसीय आत्मस्वरक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरामध्ये महिलांना शरीराचा पुर्ण व्यायाम, तायक्वांडो या खेळाचे प्रशिक्षण तसेच स्वतः चे स्वरक्षण कसे करायचे या बद्द्ल प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीर मधे ३० महिलांचा समावेश होता.
महिला वर्षातील पूर्ण दिवस स्वत:च्या कामात गुंतून असतात तर त्यांना एक दिवस काही वेगळं करायला पाहिजे हि बाब लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतल्या गेले. आणि त्यांच्या मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मजेदार खेळाची स्पर्धा सुद्धा घेतल्या गेली त्या मध्ये प्रथम क्रमांक नंदिनी ठोमरे, द्वितीय क्रमांक दुर्गा सहारे, तर तृतिय क्रमांक प्रज्ञा वाघमारे यांनी मिळविला. त्यांचा सन्मान चिन्हं देऊन सत्कार करण्यात आला. ज्या महिला या शिबीर मधे सहभागी झाल्या व उत्तम असा प्रतिसाद दिला त्यांना सुद्धा गृप द्वारे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुचिका वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कशिश खैरे हिने मानले होते. कार्यक्रमाचे नियोजन वीरा वॉरियर्स ग्रुप च्या सदस्य अदिती गायकवाड, आरोही पिसे, आस्था खैरे यांनी केले तर अयोजन सीनिअर टीम ने केले.

