प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- तालुक्यातील उसेगाव येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलास तिमांडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली होती.
आज प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उसेगाव येथे सरपंच विलास तिमांडे यांच्या निवास्थानी जाऊन सरपंच विलास तिमांडे, सदस्या मंगलाताई तिमांडे, सदस्या मेघाताई जांभुळे यांच्या शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकार, दशरथ ठाकरे, गजानन शेंडे, गणेश वैरागडे, सोहम शेंडे, श्रीराम वरघने, मोरेश्वर तिमांडे, दिनेश जांभूळे, अमोल मेंडूले, हरिहर बारस्कर, प्रफुल आंबटकर आदी उपस्थित होते.

