मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात आयोजित हिरकणी ग्लॅमर अवॉर्ड शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कनक युनिक ब्युटी स्पा अँड अकॅडमी च्या संचालिका मीना सोनटक्के यांनी केले तर ब्युटी डे टुडे चे प्रदीप मारोटकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांची उपस्थिती होती. त्यांनी त्यांच्या साधेपणा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाने सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अतुल वांदिले राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस, सौ.अंबिका हिंगमिरे सामाजिक कार्यकर्त्या व अनुताई सोमकुवर सामाजिक कार्यकर्त्या, कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी म्हणून डॉ. रमेशकुमार बोरकुटे, CEO, बॅंकिंग सेक्टरयांची उपस्थिती होती. तसेच डॉ . सचिन आणि डॉ. प्रांजल बोगावर यांचे सहकार्य लाभले. ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली व उपस्थितांना सेमिनार द्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये मेघा कपूर अमेसर, नागपूर, रेखा शर्मा, वर्धा, अमित बोरकर, नागपूर व हेतल करिया, नागपूर यांनी आपल्या सत्रांमध्ये मेकअप, स्किन, हेअरकट यासंबंधी नव्या तंत्रज्ञान आणि ट्रेड्सवर चर्चा केली आणि उपस्थित व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये बॅकस्टेज मेकअप व ब्रायडल मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला. कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ज्यामध्ये सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांनी विजेत्यांना तसेच गणमान्य व्यावसायिकांचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी स्पर्धक व आयोजन टीम चे भरभरून कौतुक केले व असे कार्यक्रम स्थानिक प्रतिभांना एक व्यासपीठ देऊन त्यांच्या सुप्त गुणांना व सक्षमीकरनात महत्वाचे योगदान देतात असे मत व्यक्त केले तसेच त्यांच्या सत्कार व आदरातिथ्य बाबत व्यवस्थापनाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रीतम गुप्ता, दिपाली रंगारी, अमित रंगारी, सुजाता जांभूळकर, सन्मान रंगारी, अदीप रंगारी, पलक गोटे, एजल सोनटक्के, कनक सोनटक्के, रितेश सोनटक्के, राहुल डेविड, लक्ष्मी डेविड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

