विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा एटापल्ली च्या वतीने ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना, छात्रवास येतील विद्यार्थी व दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. उईके, श्री. नागपुरे व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका व सर्व कर्मचारी सहकार्य केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षक सदस्य मा.पोई, देवानंद कुमरे, मधुकर चित्तलवार, महेश पुल्लूरवार, रमेश भोयर, भिवाजी कुडयेटी, राजेश बोम्मवार व दिपक नागपूरवार हे उपस्थित होते.

