आजंती येथे भव्य प्रभातफेरी, शिवार फेरी काढून जनजागृती.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत आजंती येथे लोकसहभागातून गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. तोरणे, तालुका कृषी अधिकारी एस. डी. सुतार हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात 15 एप्रिल ला मशाल फेरी काढून गावामध्ये. पाच दिवसीय कार्यक्रम घेण्यासाठी व कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने सरपंच सिमा देवढे यांचे अध्यक्षतेखाली गाव बैठक घेण्यात आली होती यावेळी कु.पि.पी.शेणवी मंडळ कृषि अधिकारी, एम.डी.वाळके कृषि पर्यवेक्षक, साक्षी देशमुख कृषि सहाय्यक, अजय सोरदे पोकरा समन्वयक, तलाठी वैभव लढी, ग्राम कृषि विकास समिती उपाध्यक्ष मारोती ढगे, सदस्य सचिव, समिती सदस्य, कृषी ताई उपस्थित होते यावेळी पोखरा संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
16 एप्रिलपासून गावात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रभात फेरी, श्रमदान, जलतारा, शिवार फेरी, चित्रकला, निबंध स्पर्धा, विहीर पाहणी, माती नमुने सह इतर उपक्रम राबविण्यात आले. यावेळी गावातील मुख्य रस्त्यांवरून प्रभात फेरी काढण्यात आली असून या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजंती शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, स्थानिक नेते, शिक्षक व कृषी विभागाचे अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी आजंती ग्रामपंचायत कार्यालयापासून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यामध्ये योजना व प्रकल्पाबाबत जागृती निर्माण करणारे फलक, घोषवाक्ये आणि माहितीपर संदेश दिले गेले. यामुळे ग्रामस्थांमध्ये हवामान अनुकूल शेती, पाण्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरण विषयक जागृता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी पोखरा योजना शेतकरी विकासाची, “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” असे घोषवाक्य देत गावातून प्रभात फेरी काढली. या दरम्यान पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय शेती व पीक विविधता यासंबंधी माहितीपर फलक, बॅनर व घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
नंतर योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीच्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या सहभागातून गावाचा नकाशा तयार करण्यात आला, ज्यामध्ये नैसर्गिक संसाधने, पिकांची स्थिती, पाणी स्रोत आदी बाबींचा समावेश करण्यात आला. हा नकाशा हवामान अनुकूल आराखड्याच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचा आधार ठरेल. मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, पोखरा समन्वयक
या सर्वांनी मार्गदर्शन करून ग्रामस्थांना प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील नागरिकांचा मोठा सहभाग लाभला होतो यात प्रामुख्याने संभाजी देवढे, मारुती देवढे, मुकेश भगत, गजानन ढगे, मारुती ढगे, किशोर वाघमारे, सारिका भस्मे, मालु गलांडे, आशा कोल्हे, शुभांगी भालकर, संगीता मोहोड, सुरेश भालकर, गजानन गलांडे, अजय मोहोड, मुख्याध्यापक आवारी, मंगेश डफ, नारायण टेकाम, गुरुदास देवळे, विलास भोयर, धर्मराज गलांडे, गोपाल गलांडे, तेजस देवढे, नारायण देवढे, अशोक भगत, रितेश देवढे, सारीका रमेश कोल्हे, गणेश गलांडे, यांच्या सह ग्राम कृषि विकास समितीतील समिती सदस्य, कृषी ताई, स्वयंसेवक गावातील, विद्यार्थी विद्यार्थिनी, बचत गटाच्या महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

