संदीप श्रीहरी पोडे यांनी रुग्णनांचा गैरसोयी बाबत दिली आमदार सुधीर मुनगंटीवार यांना संपूर्ण माहिती.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णांचा बरोबर गैरसोय सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून येथे उपचारासाठी संपूर्ण जिल्हातून रुग्ण येत असतात. पण येते सुरू असलेली गैरसोय बघता रुग्णाला आणि त्यांचा नातेवाईकांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या गैरसोय बघता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्यातील महामंत्री संदीप श्रीहरी पोडे यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत सखोल माहिती दिली आणि चंद्रपूर जिल्हा रुग्णालय सुरू असलेली गैरसोय तत्काळ थांबवावी अशी विनंती केली.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास दिला आहे की, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रुंगणाचा गैरसयीचे प्रमाण वाढलेले असून, या संदर्भात जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी लोकांसोबत बैठक घेऊन अनेक समस्यावर मार्ग काढण्या करिता नियोजन करण्याकरिता आमदार सुधीर मुनगंटीवार हे लवकरच बैठक घेणार आहे. लवकरच रुग्णाच होणाऱ्या गैरसोयी दूर होणारा आहे. व यामधून अनेक रुग्णाना दिलासा मिळणार आहे.

