रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये भांडण झाल्यानंतर त्यातील एका 16 वर्षीय तरुणाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. रोहन राहुल साळवे वय 16 वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 18 एप्रिल रोजी रात्री गावात लग्न होते. गावात लग्न असल्यामुळे रोहन साळवे हा लग्नात नाचण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे मित्रही सोबत होते. पण वरातीत नाचत असताना रोहनचे त्याच्या मित्रासोबत वाद झाला. या वादावादीचे रुपांतर किरकोळ हाणामारीत झाले. यावेळी त्याच्या मित्रांनी दोघांची समजूतही काढली. मुलांची भांडणे झाल्याची माहिती मिळताच रोहनचे कुटुंबीय त्याला त्याठिकाणावरून घरी घेऊन गेले. मात्र रोहनसोबत भांडण झालेला त्याचा मित्र हातात शस्त्र घेऊन पाठोपाठ रोहनच्या घरासमोर आला. यावेळी दोघांमध्ये परत वाद झाला. मात्र यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला.
त्यानंतर मृतक रोहन रात्री खोलीत जाऊन झोपी गेला. सकाळी बराच वेळ होऊनही मृतक रोहन आपल्या रुम मधून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोलीत जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

