गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबरनाथ:- आधुनिक अखंड भारताचे प्रणेते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक संजयकुमार दत्तात्रय सुर्यवंशी यांनी आपले वडील दत्तात्रय राजाराम सुर्यवंशी यांच्या स्मृति प्रित्यर्थ सबरबिया संकुल अंबरनाथ येथे स्थानिकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करुन सुमारे २०० गरजूंची नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ईसीजी, डेंटल चेक अप, Norological चेक अप अशा अनेक महत्वाच्या विविध मोफत आरोग्य तपासण्या केल्या. तसेच आई शारदाबाई दत्तात्रय सुर्यवंशी यांच्या हस्ते निर्विक बॉईज फुटबॉल संघाच्या फुटबॉलपटूंना मोफत टि शर्ट आणि फळ वाटपही करण्यात आले. प्रती वर्षाप्रमाणे यावर्षीही सुर्यवंशी यांनी यावर्षीही आपली सेवाभावी वृत्ती जपत बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपत संजयकुमार सुर्यवंशी हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एक निस्वार्थी, दानशूर, सेवाभावी आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जातात. आजतागायत वृध्दाश्रमांतील वृध्दांना दान, अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, नवोदित होतकरु मुलांना टि शर्ट, फुटबॉल, क्रिकेट बॅटचे वाटप, विविध सणांच्या शोभायात्रांना पुलाव, खीर, बिस्कीट, पाणी वाटप, कोरोना काळात अनेक कुटुंबांना मदतीचा हात, कोरोना तपासणीसाठी अनेकांना आर्थिक मदत, कोरोना काळात काही मृतदेहांवर स्वतः अंत्यसंस्कार, महाड, चिपळूण महापूरातील पुरग्रस्तांना अन्न धान्य, संसार उपयोगी अत्यावश्यक साहित्य वाटप, गरीब मुलामुलींच्या लग्नाकरीता मदत, बाळंतपणासाठी मदत, नातलग, मित्र मंडळी, ओळखीच्या तसेच अनोळखी मंडळींना अडचणीत मदत, अनेक रुग्णांच्या मोफत रक्त तपासण्या, बुध्द विहारे, स्मारक व इतर उपक्रमांना तसेच पुस्तक प्रकाशनाला मदत अशा अनेक प्रकारे त्यांनी आपली सेवाभावी वृत्ती दाखवून दिली आहे.

