मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हिंगणघाट तहसील कार्यालयातून कार ने बाहेर येताना अचानक पने समोर आलेल्या महीलेला कारने जोरदार धडक दिली त्यात ती
जागीच ठार झाली. ही दुर्घटना आज दि.21 एप्रिलला दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात मृतक महिलाचे नाव सावित्री राजाबाबु तिवारी वय 74 वर्ष रा संजय गांधी शाळे मागील न्यू यशवंत नगर ची असल्याची ओळख तिच्या आधार कार्ड वरून पटली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिला ही संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात कामकाज आटोपून परत जात होती. इतक्यात कार क्र. एम एच 32 ए एन 8444 ने तिला जबर धडक दिली. या कार मधे खत्री आणि साखरकर हे पेट्रोल पंपचे मालक बसले होते. आणि अमोल खोडे रा अल्लीपूर हा कार चालवत असल्याची माहिती मिळाली. अपघात होताच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. यावेळी नागरिकांनी तिला त्याच कार मधून रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
कार चालकाने रुग्णायातून पळ काढला! या दरम्यान ज्या कारने तिला जोरदार धडक दिली तिने तिथून पळ काढला. ही कार माजी खासदार सुरेश वाघमारेच्या पत्नीच्या नावावर असल्याची कळते. प्रकरणात पोलीस मध्ये तक्रार दाखल करण्यात आली, यात पीएसआय लक्ष्मीकांत दुर्गे व सहाय्यक अंगेश्वर चौधरी पुढील तपास करीत आहे.

