मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संजय मेमोरियल टीचर्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वणी येथील संजय गांधी विद्या विहार शाळेने दहावीच्या परीक्षेत यंदाही १०० टक्के निकाल नोंदवून आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थी तन्मय खांडरे याने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. युक्ती बावणे हिने द्वितीय, तर पूनम चहाणकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष के.के. वाघमारे, सचिव वैशाली वणीकर, कार्याध्यक्ष सु. दा. पांढरे, सहसचिव कुशाब लेदाडे, उपाध्यक्ष के.एम. सिद्दिकी आणि कार्यकारणी सदस्य लक्ष्मण डहाके व नारायण सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत ठाकरे, वर्गशिक्षक प्रकाश उरकुडे, नरेश पुसदेकर आणि श्रद्धा भजभूजे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांनी आपले श्रेय शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. शाळेच्या या उत्कृष्ट निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

