मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गु्हमंत्री,पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सोशल मिडियावर गावातील मुलींबद्दल बदनामकारक मजकुर पोस्ट करणार्या तसेच बंदी असुनही कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरीत्या ड्रोनचे वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुण त्यांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आयडी बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन राज्याचे मुख्यमंत्री तसेच गु्हमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावनेर तहसीलदार रवींद्र होळी यांच्या मार्फत, तर पोलीस महासंचालक, पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा ग्रामिण यांना उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर यांचे मार्फत व अनिल म्हस्के पोलीस उपविभागीय अधिकारी सावनेर यांना करण्यात आली.
शहरातील काही टवाळखोर युवक मंडळी स्वताला सोशल मिडिया इंफ्लुंजर म्हणून वाँटसप, फेसबुक, इंस्टाग्रामवर सावनेर शहराच्या नावाचा उल्लेख करत “सावनेर की लडकीया कहासे कपडे खरीदती है, जीससे वो इतनी सुंदर दिखती है. “अरे भाई पटी क्या कोई”, “सावनेर की लडकीया मुंबई जाकर”, “बोलो सावनेर मीली क्या कोई”, सावनेर की लडकीया दिल देखती है या पैसा”, सावनेर की लडकी पटाओ और २० दीनमे टेन्शन डबल पाओ, असे शहरातील विविध भागातील रस्ते, चौक आदींचे फोटो व्हिडीओ सह मँसेज अपलोड करुण शहरातील मुलींच्या आबरुचा खेळ मांडुन सावनेर शहराला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचत असलेल्या सावनेर वाला, अपना सावनेर नागपुर, शहरातील सारखे अनेक युवक आपल्या शुल्लक प्रसिद्धी करीता फेसबुक इंस्टाग्राम पेज बनवून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय ईमारती, पोलीस स्टेशन आदीचे फोटो व्हिडीओ अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे सावनेर शहरातील मुलींना त्यांच्या पुढील भविष्यात धोका निर्माण होऊन त्यांच्या चारित्र्यावर शक शुबा होऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोबतच सद्यस्थितीत भारत पाकिस्तान या दोन देशात युद्ध सद्रुष्य स्थीती निर्माण असल्याने केन्द्रीय व राज्य गु्हमंत्रालयाव्दारे नागपुर जिल्ह्यात येणाऱ्या ३ जुन २०२५ पर्यंत ड्रोन, रिमोट कंन्ट्रोल व्दारे उडणारे हेलिकॉप्टर, पँराग्लायडर, पँरामोटर्स, सुक्ष्म प्रकाश विमान, एयरोमाँडल, हवाई फुगे, पँराशुट आदी उडविण्यावर बंदी घातली असुनही शुभम बोंडे नावाचा युवक व त्याचे सहकारी हररोज अवैधरित्या ड्रोन उडवत आहे. यामुळे शहरातील गुप्त माहीत रस्ते, शासकीय इमारती आदिंची माहीती शत्रू देशाला सोशल मीडिया वरुन सहज प्राप्त होऊन देशाच्या व आपल्या परिसराला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करीता सोशल मिडियावर पौराणिक महत्वप्राप्त सावनेर शहराच्या नावाने पावित्र धोक्यात टाकु पाहु इच्छित तसेच शहरातील मुलींच्या भवितव्याचा खेळ मांडणार्या वरिल या सर्व तसेच अन्य सोशल मिडिया इन्फ्लुंजरर्स चा शोध घेऊण कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पुढे भविष्यात कोणताही युवक शहर व शहरातील मुलींच्या विषयी अपरिहार्य वक्तव्य करुण शहर व शहरातील मुलींच्या भवितव्यास धोका निर्माण करणाविषयी विचार करणार नाही. अशी विनंती निवेदनातुन करण्यात आली आहे. याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष भिमराव उर्फ राजु घुगल, युवा समाजसेवी भुषण कुबडे, राजा फुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

