रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतुर गटविकासअधिकारी राजेश तांगडे यानी गटविकास अधिकारी पदाचा दुरुपयोग करुण बोगस कामे केले आहे. गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांनी पदाचा दुरुपयोग केल्या बद्दल चौकशी करून निलंबित करण्यात यावे वंचित बहुजन आघाडी यांची मुख्यकार्यकारी अधिकारी जालना यांच्याकडे मागणी.
१) मागील वर्षामध्ये जुणे विहीरीचे कुशल बिल दाखल केले आहे. जुणे शेत तळ्याचे बिल काढले गेले आहे. व बोगस पांदन रस्ते काम न करता कुशल दाखल केले गेले आहे. मुदा क्रमांक २) तसेच नवीन विहीरी च्या मंजुरी साठी २०,००० वीस हजार रुपयांची मागणी करत आहेत. तरी राजेश तांगडे बीडीओ साहेबांवर चौकशी करुन निलंबण व कायदेशीर कार्यवाहीची मागणी वंचित ता.अध्यक्ष रवी भदर्गे यांनी केली आहे
परतुर गटविकासअधिकारी राजेश तांगडे यानी गटविकासअधिकारी पदाचा दुरुपयोग केला आहे, भुसंपदन क्षेत्रात झालेल्या पादंन रस्त्याचे कुशल बिल दाखल केले गेले आहे, ता. परतुर येथे जुन्या विहीरी असताना ही कुशल बीले काढल्या गेले आहेत, तालुक्यात बोगस शेत तळयाचे कुशल कामे व बीले दाखल केले आहे अशी तक्रार ता.अध्यक्ष रवी भदर्गे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जालना यांच्याकडे केली आहे व तीव्र आंदोलन आक्रोश मोर्चा व आमरण उपोषण आपल्या कार्यलया समोर करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

