संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- कुशल प्रशासक, कर्तृत्ववान राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी (३०० व्या) जयंती निमित्त जिल्हा काँग्रेसचे कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनोद दत्तात्रय, संतोष लहामगे, चंदाताई वैरागडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, भालचंद्र दानव, दिपक कात्रोजवार, राजेश रेवलीवर, शिरीष गोगुलवार, राहुल चौधरी, पप्पू सिद्दीकी यासह काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

