विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील केंद्रीय रिजर्व पोलीस बल 191 बटालियन चे कमांडंट श्री सत्य प्रकाश यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात वेळोवेळी सिविल ऍकशन चा माध्यमातून उपक्रम रबतात यात जिल्हा परिषद, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा चे शाळेकरी विद्यार्थ्यांना झाले लावा आणि झाले जगवा हा मंत्र देत 200 हुन अधिक वेगवेगळ्या प्रजाती चे वृक्षारोपण करण्यात आले.
त्यात गावातील जेष्ठ नागरिक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी ने पण सहयोग केला. यावेळी सी आर पी एफ बुर्गी चे सहाय्यक कमांडंट साकेत विक्रम सिंग, निरीक्षक नरोत्तम कर, उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर, पुरी पोलीस उपनिरीक्षक बुर्गी , सहाय्यक उप निरीक्षक सी आर पी एफ देविदास, हेड कॉन्स्टेबल पागर किशोरे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

