अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २४ जुलै:- सावनेर येथील माळी समाज पंच कमिटी व समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा भक्ति व उत्साहात पार पडला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
होळी चौक येथील संत सावता महाराज मंदिरात समाजसेवक डॉ पुरुषोत्तम घोळसे यांच्या हस्ते श्री ची स्थापना व ध्वजारोहण करून या महोत्सवातील तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळ सायंकाळ भजनांचे कार्यक्रम झाले.हरिपाठ घेण्यात आला.दिनेश महाराज मोहतुरे यांचे किर्तन व दहिकाल्यानंतर माजी नगराध्यक्षा रेखा मोवाडे,माजी नगरसेविका कमल गायधने,माजी नगरसेविका रंजना बनाईत,माजी नगरसेविका नलिनी नारेकर यांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या पालखीतील महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन शहरात मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत स्थानिक भाविकांसह शहरातील दिंड्यां व परिसरातील दिंड्यांचा सहभाग होता टाळ मृदंगाच्या गजरात व संतांच्या जयघोषात ही मिरवणूक झाली. मिरवणुकी दरम्यान भाविकांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
गांधी चौकातील किराणा व्यापारी नामदेव सावजी यांनी या पालखीतील आपली जुनी परंपरा जोपासून दहीहंडी कार्यक्रम केला.मिरवणूक मंदिरात पोहोचल्यानंतर दिंड्या व भजनी मंडळींना नारळपान देऊन सामाजिक कार्यकर्ते मंगेश चरपे,पत्रकार मनोहर घोळसे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.महाप्रसादाने उत्साहाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज पंच कमेटी व समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

