संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- इन्फंट् जिजस सोसायटी राजुरा, द्वारा संचालित इलिट इंटरनॅशनल स्कूल, गोंडपिपरी येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांच्या हस्ते सकाळी ८ : ५५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नर्सरी क्लासच्या इशिता जीवने,नवर्षी देवगडे यांनी तर के. जी. 1 च्या शिवाय येळमुले या चिमूकल्यांनी आपल्या बोबड्या भाषेत सुंदर भाषण दिले. तसेच नर्सरी आणि एलकेजी च्या वर्गांनी सुंदर डान्स सादर करून उपस्थित पालकांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, शंभुजी येलेकर, अजय माडुरवार, तुकाराम झाडे, अनिल झाडे, यासह अनेक मान्यवर तसेच गोंडपिपरी येथील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

