विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील एकरा (बु.) येथील आदिवासी समाजातील कु. रोहित रमेश दुर्वा वय 19 वर्षे याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये 720 पैकी 460 गुण मिळवून MBBS करिता पात्रता मिळवली आहे.
रोहितने 1 ते 5 पर्यंतच प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर 5 वी ते 7 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथे पूर्ण केले. त्यानंतर हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आज तो वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचला आहे. हे यश आदिवासी समाजातील युवक-युवतीं साठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या यशाबद्दल आदिवासी गोटूल समिती एटापल्ली तसेच आदिवासी युवा समिती एटापल्ली येथील शिष्टमंडळाने त्यांच्या राहत्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, संविधान ग्रंथ व भारूड (IAS) यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देऊन सत्कार केला. यावेळी आदिवासी गोटूल समिती एटापल्ली चे अध्यक्ष अक्षय पुंगाटी, युवा समिती अध्यक्ष शुभम रापंजी, उपाध्यक्ष युवा समिती उज्वल मडावी, नामदेव हिचामी सभापती न. प. एटापल्ली, अनिकेत हिचामी, उमेश पोरतेट, चिंटू कुळयेटी, दिलीप वड्डे तसेच बहुसंख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
रोहितच्या यशामुळे एकरा (बु.) गावाचे तसेच एटापल्ली तालुक्याचे व आदिवासी समाजाचे नाव अभिमानाने उजळले आहे.

