राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरातील ही घटना आहे. बायकोसोबत एकांत मिळत नसल्याने रागाच्या भरात आरोपीने हे सातापजनक कृत्य केले. या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडालली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसारक, बायकोसोबत एकांत मिळत नव्हता. यामध्ये अडसर ठरणाऱ्या मुलीला बापाने संपवलं. चार वर्षांच्या मुलीची त्याने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रामध्ये फेकून देण्यात आला. मुंबईतल्या कुलाबा परिसरातील ससून डॉकजवळील समुद्रामध्ये या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी या मृत मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचे वडील देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना या मुलीच्या वडिलांवर संशय आला. मुलीच्या शवविच्छेदन अहवालात देखील गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पथके तयार करून मुलीच्या वडिलांचा शोध सुरू केला. अखेर वरळी परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपी पीडित मुलीचा सावत्र बाप आहे: प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीला संपवलं; क्राईम शो पाहून रचला हत्येचा कटआरोपीने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबुल केला. त्याने सांगितले की, त्या 4 वर्षांच्या मुलीमुळे तो बायकोसोबत एकांतामध्ये क्षण घालवून शकत नव्हता. रात्री देखील मुलगी उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असायची. त्यामुळे त्याची सतत चिडचिड व्हायची. याच सर्व रागातून त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली त्यानंतर मृतदेह समुद्रात नेऊन फेकला. या घटनेमुळे अँटॉपहिल परिसरात खळबळ उडाली आहे.

