यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील दारव्हा शहरात रेल्वे उड्डाणपुल बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डात पडून चार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे संपूर्ण दारव्हा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दारव्हा शहरात रेल्वे उड्डाणपुल बांधकामासाठी खड्डा खोदकाम सुरू आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात खेळण्यासाठी चार अल्पवयीन मुले गेली होती. खेळण्याच्या नादात या चारही मुलांनी खड्ड्यात उड्या मारल्या. पण दुर्दैवाने त्यांचा त्यात पडून मृत्यू झाला.
रीहान असलम खान वय 13 वर्ष, गोलु पांडुरंग नारनवरे वय 10 वर्ष, सोम्या सतीश खडसन वय 10 वर्ष आणि वैभव आशीष बोधले वय 14 वर्ष हे चौघे जण त्या खड्ड्यात खेळण्यासाठी गेले होते. हे चौघे ही दारव्हा इथले रहिवाशी आहे. त्यांनी या खड्ड्यात उडी घेतली. पण पाणी खोल असल्याने ते चौघे ही पाण्यात बुडू लागले. पण आजूबाजूला कोणी नसल्याने त्यांना वाचवता ही आले नाही.
कोणी तरी खड्ड्यात पडले आल्याची माहिती परिसरात पसरली. त्यानंतर अनेकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. खड्ड्यातून त्या मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्याना मृत घोषीत करण्यात आले. त्यावेळी त्या मुलांच्या कुटुंबीयंनी हंबरडा फोडला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

