युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आंदोलन.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील हेडरी ते गट्टा रस्ता अत्यंत खराब झाले असून तात्काळ बनविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) एटापल्ली तालुक्याच्या वतीने युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात बुधवारी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रव्वा यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, एटापल्ली तालुक्यातील हेडरी ते गट्टा हा 381 क्रमांकाचा असून सद्यस्थित या रस्त्याची दयनीय व बिकट परिस्थिती असून रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत अवघड व कठीण बनले आहे. त्यामुळे प्रवासी, नागरिक, गरोदर महिला रुग्णांकरिता धोकादायक असून तात्काळ रस्ता बनविण्याची तीव्र व एकमुखी मागणी निवेदनातून केले.
आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रव्वा यांना युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात निवेदन देताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) एटापल्ली तालुकाध्यक्ष संभा हिचामी, एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती जनार्धन नल्लावार,गट्टा उपसरपंच महक लेखामी, जांबिया सरपंचचेतन हिचामी ग्रामपंचायत सदस्य राजु नरोटे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, गेदा ग्राम पंचायत सदस्य अजय पदा, गेदा उपसरपंच दसरू मट्टामी, जेवेली सरपंच मुन्ना पुंगाटी, कृष्णार पाटील सदाशिव हिचामी,सत्तू दोरपेटी,दुलासा हेडो,उमेश हिचामी , महारू लेकामी ,मिरवा लेकामी, सुधाकर पदा, कटिया गोटा, दिनेश लेकामी,निकेश गोटा,सुरेश उईके,साईनाथ वड्डे आदी कार्यकर्ते होते.

