सौ.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला तहसीलदार बल्लारपूर यांना वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूरने निवेदन सादर केले. या निवेदनात मागणी करण्यात आली की बल्लारपूर शहरातील मुख्य रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे तरी तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक बोलावून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा. राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पाईप लाईनचे काम केले असता रस्ता फोडण्यात आला होता परंतु त्याची दुरुस्ती अजून पर्यंत झालेले नाही तसेच हा राष्ट्रीय महामार्ग असून सुद्धा यावर पादचाऱ्यांना चालण्याकरिता फुटपाथची व्यवस्था नाही ती सुद्धा त्वरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
वस्ती कडे जाणाऱ्या गोल पुलिया खाली रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्याकरता सुद्धा रेल्वे विभाग तसेच नगर प्रशासन यांना कार्यादेश द्यावे अशी विनंती करण्यात आली जेणेकरून गोल-फुलिया खालून येजा लागले करणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही शहराच्या मुख्य मार्गावर जागोजागी जे खड्डे पडले आहेत तेच अपघाताचे कारण ठरत आहेत विशेष म्हणजे 11 कोटीने निर्मित बस स्टॅन्ड समोर मोठा खड्डा पडलेला आहे या सर्व समस्यांची माहिती देत नायब तहसीलदार साळवे यांना निवेदन प्रेषित करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेखा पागडे, महिला गाडी तालुका सचिव प्रज्ञा नमनकर, किरण रामटेके, पंचाताई वेले, प्रतिमा खेकारे, संगीता शेंडे, अनुताई पेटकर, जोशीला वाघाडे, अनिता नगराळे, माला करमणकर आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

