विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्थानिक नगर पंचायत, एटापल्ली अंतर्गत माहे डिसेंबर 2024 मध्ये विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा घेण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, टाकाऊ वस्तू पासून टीकाऊ वस्तू, वॉल पेंटिंग असे अनेक विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली, जिल्हा परिषद हायस्कूल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील बरेच आदिवासी, गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
यामध्ये राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथील 5 वी ते 7 वी गटातील चित्रकला स्पर्धेत द्वितीय व तृतीय तसेच 5 ते 10 वी गटातील टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ या स्पर्धेत प्रथम आणि तृतीय तसेच वॉल पेंटिंग या स्पर्धेत प्रथम असे एकूण 5 विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले होते. परंतु नगर पंचायत प्रशासन यांनी 7 महिने ओलांडून देखील सदर विद्यार्थ्यांना पारितोषिकची रक्कम देण्यास हलगर्जीपणा करीत होते. याबाबत श्रीकांत कोकुलवार (माजी तालुका अध्यक्ष, रा.काँ.पा.) यांनी यापूर्वी नगर पंचायतच्या अधिकाऱ्यांना साधारणतः तीन वेळा पारितोषिक बाबत विचारणा केले पण त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होते.
15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्रदिना निमित्ताने नगर पंचायत प्रशासन सर्व अधिकाऱ्यांना वेठीस धरले आणि पारितोषिक रक्कमची विचारणा केली आणि त्यांना पत्रकार परिषद घेऊन आपण वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती केले की असे काहीच करू नका आम्हाला 20 ऑगस्ट पर्यंत वेळ द्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिकाची रोख रक्कम देऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी नगर पंचायत एटापल्ली येथे या सर्व विद्यार्थांना पारितोषिकाची रोख रक्कम देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

