सनातन दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना निवेदन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दशनाम गोसावी समाजाचे विकासा करीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. तसेच विविध मागण्या करीता येथील दशनाम गोसावी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. ना. पवार हे वर्धा येथे आढावा बैठकी करीता आले असता त्यांना सदर मागण्याचे निवेदन देण्यात आले.
दशनाम गोसावी समाज हा महाराष्ट्र राज्यातील व संपूर्ण देशातील एक व्यापक समाज असून हिंदू धर्मीय परंपरा श्रद्धा सांस्कृतिक मूल्य व समाज प्रबोधनासाठी अनेक वर्षापासून आपले योगदान देत आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही सोयी सुविधा योजना व प्रोत्साहन मिळाले नाही. समाजातील बहुतांश कुटुंबे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असून, भिक्षावृत्ती रोजंदारी या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहे. परिणामी रोजगार, शिक्षण, उद्योगधंदे, महिला सक्षमीकरण व आरोग्य या सर्वच क्षेत्रात हा समाज मागे पडला आहे. त्यामुळे या समाजाच्या विकासाकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासाकरिता विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा, रोजगार व उद्योग धंदा करिता समाजातील युवकांना कर्ज व शासकीय योजना त्या पद्धतीने उपलब्ध करून द्याव्या, समाज भवन, दफनभूमी, देवस्थान या विषयावर शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावे. आदि मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी विद्या गिरी, छत्रपती गिरी, गोपीचंद गिरी, उर्मिला गिरी, उमेश गिरी, शारदा गिरी आदी सनातन दशनाम गोसावी समाज संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

