विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- दिनांक 05 सप्टेंबर रोजीअहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गावे मेडपल्ली, कासमपल्ली, कोरेल्ली बु, गुर्जा बु, कोरेल्ली खुर्दे या गावातील शेतकऱ्यांना वर्मी बेड सरपंच निलेश वेलांदी यांचं हस्ते वितरण करण्यात आले असून हा उपक्रम अती प्रभावित मेगा पाणलोड प्रकल्प अंतर्गत भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान दिल्ली ऑक्सिस बँक व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील 20 ग्रामपंचायत मधील 69 गावात प्रकल्पाचे काम सुरू केले आहे या प्रकल्प खाली खरीप हंगामा 2025- 26 मध्ये 186 धानाचे डेमो धारक लाभार्थी व 36 भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आजीविकेचा विकास व शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना वर्मी बेडची आवश्यकता, गांडूळ खताची निर्मिती प्रक्रिया आणि त्याचा शेतीतील उपयोग यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात व गांडूळ खत उत्पादन हे सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, सेंद्रिय पदार्थांची वाढ होते आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वर्मी बेडचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यात आली . या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.
वर्मी बेडचा वापर केल्यास त्यांना उच्च दर्जाचे गांडूळ खत मिळेल, त्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेती अधिक शाश्वत बनेल. यातून त्यांना आर्थिक सक्षमता मिळण्यास मदत होईल व आजच्या बेसुमार रासायनिक खतांचा वापर करण्याच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातून विषमुक्त अन्न तयार होवून शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारेल असे मनोगत बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. कुडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रस्तावना बायफ संस्थेचे उपजीविक तज्ञ अतुल डोरलीकर यांनी तर समन्वयक श्रीमती अलका तलांडे व प्रेरक बाबुराव तलांडी आदी परिश्रम घेत आहेत यावेळी, ग्रामसेवक जी डी मडावी ग्रा.पं. शिपाई बाबुराव नरोटे, सिताराम मेश्राम, मंगु पोदाळी, बिच्चु गावडे, पाटाळी पल्लो, सान्ना गावडे, सुनिता पेन्दामा हे शेतकरी लाभार्थी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना ड्रम कल्चर पिवळे चिकट सापडे गांडूळ कल्चर बीज जीवामृत दशपर्णी अर्क साहित्य त्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देखील दाखवले गेले त्यामुळे त्यांना वर्मी बेडचा वापर बद्दलची माहिती मिळली या प्रकल्प द्वारे शेतकऱ्यांचा जीवनमान सुधारणा घडवून आणले जात आहे तसेच सेंद्रिय शेतीचा प्रसार केली जात आहे.

