संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित सुभाष धोटे यांनी अलीकडेच सास्ती गावाला भेट देऊन विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदवला. त्यांनी प्रथम गावातील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले व स्थानिक युवकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
यानंतर त्यांनी गावातील दिवंगत विकास भटारकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी व मुलगा अनुज भटारकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी भटारकर कुटुंबाचे सांत्वन करून दुःखात धीर देण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी सास्ती ग्रामपंचायत सदस्य मधुकर झाडे, अक्षय मुळे, कमलाकर तिखट, महेश लांडे, मिथलेश रामटेके, नदीम शेख, सुरेश गजलवार, संतोष कुडे, साहिल तिखट, आकाश चन्ने, सचिन नळे, बडुभाऊ ऊपरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. धोटे यांच्या या दौऱ्यामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये उत्साहाचे संचार झाले.

