मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जकात फॉउंडेशन हिंगणघाटच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर च्या जयंती चे पावन पर्वा च्या निमित्त शासना द्वारे गोकुलधाम मैदाना समोर उभारल्या जात असलेला प्रवेश द्वाराला मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रवेश द्वार असे नाव देण्याबाबत उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे फक्त राष्ट्रपती नसून देशाला महाशक्ती बनविण्या साठी मिसाईल टेकनॉलॉजि प्रदान केली आहे त्यांनी दिव्यांग बांधावा साठी कृत्रिम हात, पाय, तयार केले त्यांनी राष्ट्रपती असताना अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे त्यांचे नाव प्रवेश द्वाराला देऊन हिंगणघाट वासियांना गौरवीत करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली.
यावेळी जकात फॉउंडेशन चे अध्यक्ष फिरोज खान, द्वारे देण्यात आले सोबत उपाध्यक्ष शाकीर खान पठाण, सचिव प्रा. फारीश अली, ऍड. मुबारक मालनस, ऍड. अर्शी आजमी, मिर्झा दौलत, सय्यद शाहीन, असद खान, अबरार फारुखी व इतर उपस्थित होते.शहर प्रतिनिधी

