मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करत असतात . आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, साहस, सहकार्य, समाजाभिमुखता या गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्वाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे. अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. असे विचार प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे सहसचिव संजयराव देशपांडे यानी व्यक्त् केले ते हिगंणघाट येथील भारत विघालयात देशाचे दिवगंत राष्टपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्य आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हरिष भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, मनिषा कोंडावर माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2025 चे गुणवंत विद्यार्थी संघर्ष येरणे, साक्षी महाजन, मयुर पाटिल, पालक मंगेश येरणे यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षक डॉ.विनोद डोमकावळे यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थी संघर्ष येरणे, साक्षी महाजन यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक हरिष भट्टड करताना म्हणाले की शिक्षण क्षेत्रात अधिकाअधिक विकसित व्हावा चांगल्या शिक्षकांचा गौरव झाला पाहिजे. याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करता यावा म्हणून सर्व शिक्षकानां व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल निकीता कामडी यानी तर आभार उपमुख्याध्यापक किशोर चवरे यानी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करता यावा म्हणून सर्व शिक्षकानां व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला पुष्पगुच्छ देवून आदर व्यक्त केला .

