अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री. क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांचा सहामाही उर्स बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकता अखंडता याचे प्रतीक श्री.बाबा ताजुद्दीन औलिया यांनी आपल्या जीवनातील १२ वर्षाच्या जीवनकाळ वाकी येथे घालविला. त्यांच्या चरण स्पर्शाने वाकी नगरी पावन झालेली आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा. प.पू.श्री.काशिनाथ नाना डहाके पाटील यांच्या वाकी गावातील निवासस्थानातून (वाडा) संदल निघुन तो वाकी गावाला गस्त करून सायंकाळी ६ वाजता वाकी दरबार येथे पोहोचला. परंपरेनुसार सज्जादा नशीन श्री.ज्ञानेश्वरराव डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्यानंतर बाबांना चादर चढवण्यात आली व उर्सला प्रारंभ झाला. लगेच महाप्रसाद वितरनाला सुरुवात करण्यात आली.रात्री ८ वाजता मिलाद व कव्वालीच्या कार्यक्रम आटोपला.
४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कुल शरीफचा कार्यक्रम होऊन उर्सची समाप्ती झाली. या उर्स कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबांचा आशीर्वाद घेतला अशी माहिती
श्री. बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन श्री. प्रभाकरजी डाहाके पाटील यांनी दिली.

