अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- ३० सप्टेंबर शनिवारला बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री टाले सरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक श्री राऊत, क्रीडा तालुका सचिव चव्हाण, श्री. शर्मा तसेच चंद्रकांत कोमुजवार उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ३७ संघापैकी ३१ संघ खेळले. यामध्ये सदर शाळेच्या विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे यश संपादन केले.
अंडर १९ वर्ष मुलींच्या वयोगटात (सीबीएसई बोर्ड), अंडर १७ वर्ष मुलांच्या वयोगटात (सीबीएसई बोर्ड), अंडर १४ वर्ष मुलींच्या वयोगटात (स्टेट बोर्ड) हे संघ तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर होणाऱ्या हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षक श्री.चंद्रकांत कोमुजवार, अक्षय घोरमारे सर यांना दिले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.अशोक जीवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जीवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके पाटील, मुख्याध्यापिका ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे, अमोल जिवतोडे, सिमा परमाल, नितिन दोरखंडे, प्रविना पारसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृन्द यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

