मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात पहिल्यांदाच पितृपक्षाच्या पावन पर्वावर 14 दिवसीय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या काळात, मथुरेहून आलेले परमपूज्य संत श्री गोविंदजी महाराज आपल्या ओजस्वी वाणीतून भाविकांना श्रीमद् भागवत कथेचा रसपान घडवत आहे.
या महोत्सवाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता बालाजी मंदिरापासून एका भव्य शोभायात्रेने झाली. ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गांमधून मोहता भवन येथे पोहोचली. शोभायात्रेत पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या महिला आणि पुरुष आपल्या डोक्यावर मंगल कलश घेऊन चालत होते. बॅंड-बाजांच्या तालावर आणि भजन-कीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. कथेचे मुख्य यजमान गोपी मानधनिया परिवाराने श्रीमद् भागवत ग्रंथ डोक्यावर धारण केला, तर कथा व्यास भक्ती सुमन गोविंद महाराज रथावर विराजमान होते. वैशाली उरकुडकर आणि गायत्री परिवाराच्या भगिनींनी स्वागत गीत गाऊन गोविंद महाराजांचे स्वागत केले.
समितीचे अध्यक्ष विजय राठी यांनी पुष्पहार घालून स्वामीजींचे स्वागत केले. स्वामीजींनी भागवत महापुराणाचे महत्त्व वर्णन करताना सर्व भाविकांना दुपारी 3 वाजल्यापासून कथेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी पितृपक्ष आणि चंद्रग्रहणाच्या दुर्मिळ ‘दुग्ध-शर्करा’ योगावर भागवत नाम संकीर्तनाचे महत्त्व देखील समजावून सांगितले.
मंचाचे सूत्रसंचालन वासुदेव त्रिवेदी यांनी केले. त्यांनी या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी रवींद्र गोयनका, विजय उरकुडकर, सुंदर बसंतानी, मोहन खिलवानी, भरत रूपारेल, ब्रिजमोहन करवा, अरुण हुरकट, प्रदीप जोशी, राजेंद्र भंगडिया, राजेश कोचर, तपेश चंदाराणा, राकेश शर्मा, श्रेणिक कोचर, संतोष बोधानी, राजेश कोचर यांसारखे अनेक सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

